सम-वेदना

गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात सर्व स्थरांवर निरंतर चर्चा सुरु आहे ती म्हणजे दिसेंबर १६ ला घडलेल्या एका भीषण बालात्काराची. त्या रात्री ६ पुरुषांनी, ज्यांच्यापैकी एक तर १७ वर्षांचा ‘अज्ञान’ मुलगा होता, मिळून एका २३ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिच्या योनीत एक गंजलेली सळी घुसवली, तिची मारहाण केली, व एकंदरीत तिला व तिच्या पुरुष साथीदाराला अनेक यातना दिल्या. २९ दिसेम्बेर रोजी, तिच्या आतडी व मेंदूला प्रखर जखम झाल्यामुळे, तिने प्राण सोडला. अनेक प्रकाशनांनी तिला वेगवेगळी नामे दिली आहेत जसेकी निर्भया, दामिनी, जागृती, इ.
‘दामिनी’च्या मृत्यू नंतर आरोपींना कोणती शिक्षा योग्य ठरेल असा प्रश्न सरकार्रला पडला आहे. बहुसंख्यांक लोकांना असे वाटते की फाशीची शिक्षा किंवा रासायनिक रित्या नपुंसक करणे हेच योग्य राहील. अनेकांचे हेही मत आहे की सरकारने स्त्रियांवर होणा-या हिंसक व लैंगिक छेडछाडीविरोधात अजून पक्के कायदे अमलात आणले पाहिजे. पोलिसांना स्त्रियांवर होणारे हिंसेचे विविध प्रकार व लिंगभेद ह्याबाबत अधिक संवेदनशील असणे गरजेचे आहे, हे देखील चर्चांमध्ये नजरेस आले आहे.
हे सगळे प्रस्ताव बरोबर आहेत व त्यांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे असे मी पूर्णपणे मानते. पण इतकेच पुरेसे ठरेल का? खरंतर ह्या बलात्काराला कोण कारणीभूत आहे? आपले सरकार, आपलं पोलीस सैन्य, ते ६ बलात्कारी पुरुष, की आपण एकंदरीत तयार केलेली ‘बलात्कारी’ संस्कृती, हे विचार करण्यास्पद आहे.
आपला देश एक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष व न्यायप्रिय संविधान मानतो. भारतीय संविधान स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतं. पण आपल्या भारतीय समाजात स्रियांचे स्थान हे पुरुष्यांच्या समान आहे का? आणि समाज घडवणारे आपण सगळे सुद्धा ह्या असमानता बाळगतो का, असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. स्वतःला थोडे खोलवर पारखून बघितले तर लक्षात येईल की आपणच कित्तेकदा लिंगभेदाला जवाबदार ठरतो.
प्रसार माध्यमांच्या प्रभावामुळे आपण अभावितपणे का होईना पण अनेक निकष बनवतो – ते सुंदरतेचे, लैंगिकतेचे, व यशाचे असो, किंवा सामान्यतेचे. कोणत्या गोष्टी समाजात ‘सामान्य’ किंवा ‘normal’ मानल्या जातात, त्या कोण्याच्या म्हणण्या प्रमाणे, ह्याचा कधी विचार केला का? सिनेमा, टी.व्ही. सीरिअल व जाहिरातींमध्ये स्त्रीयांना सौम्य, अबला असेच दर्शवला जाते, जिला कोणीतरी ताकतवर, ‘मसल्स’ असलेला पुरुष नेहमी वाचवतो. खरंतर अधिकंश स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामे करतात, ते घरकाम असो, शेतीचे काम किंवा मुलांना जन्म देण्याचे काम का होईना! पण स्त्रीयांनाही हेच शिकवले जाते, की आपण अजाण, अबल आहोत ज्यांचे यश, आयुश्याचे सार्थक, अर्थात अख्ख अस्तित्व हे आपल्या आयुष्यातील पुरुषांवर औलंबून आहे. बघा ना, ‘फेअर एँड लवली’ च्या जाहिरातीतल्या मुलीला ते क्रीम लावाल्यानंतर मुलगा पसंत करतो म्हणून तुम्ही पण हे ‘फेअर एँड लवली’ क्रीम विकत घ्या, असा संदेश दिला जातो. (खरंतर सुंदरता ही ‘फेअर’ म्हणजे गोरं होण्यातच आहे असेही कोणी सांगीतले, हे पारखून बघितले पाहिजे!)
दुसरे म्हणजे स्त्री ही एक स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ति नसून एक भोगवस्तू आहे जी फक्त पुरुषांच्या लेंगिक चैनीसाठी वापरता येते असे दर्शवले जाते. स्त्री-हक्कांवर काम करणा-या अनेक संशोधकांनी असे पटवून दिले आहे की प्रसार माध्यमांत, एकंदरीत समाजातही स्त्रीयांना बघण्याची वृत्ती ही एक ‘मेल गेझ’, अर्थात पुरुषी नजर आहे. जाहिरातीत अनेकाहून जास्त वेळेला एका स्त्रीला अक्षरशः एक वस्तू बनवलेलं दिसेल, जसं की एका ‘सोफ्ट-ड्रिंक’च्या जाहिरातीत ती मुलगी त्या पेयाच्या बाटलीचं स्वरूप घेते. नाहीतर स्त्रियांच्या काही विशिष्ठ अवयवांवर लक्ष कांद्रित केलं जातं, खासकरून तिच्या स्तनांवर. म्हणजे ‘स्त्री’ होणं हे फक्त एक शरीर होणं असं का? आणि हेच जर आपण आत्मसात करत असलो तर आपणही प्रत्येक महिलेला, विशेषकरून रस्त्यावरच्या एका अनोळखी महिलेला एक शरीर, नाकी एक पुरेपूर्ण व्यक्ति, मानणार.
पुर्षांनाही, ‘पुरुषार्थ’ अभिव्यक्त करायचा एकच मार्ग दाखवला जातो. ‘मर्द को कभी दर्द नही होता’, एक ‘खरा’ पुरुष म्हणजे जो हिंसक, निर्भय, व स्त्रियांवर हावी होणारा असला पाहिजे, असे दर्शवले जाते. एका ‘डीओडरन्ट’च्या जाहिरातीत असेही म्हटले आहे कि तुम्ही ‘बायकांचा’ सुगंध वापरला तर तुम्ही ‘बाई’ व्हाल, जसे की बाई होणं हे तुच्छ! असे संदेश पुरुषांच्या मनात स्त्रियांसाठी ना आदर निर्माण करतात ना संवेदना. मग असे संदेश प्रसार माध्यमे आपल्या पर्यंत का पोचवतात, असा शोध घेतला पाहिजे.
तितकेच नव्हे तर अपल्या समाजातले नायक किंवा आदर्श व्यक्तींच्या मनात स्त्रियांच्या काय प्रतिमा आहे, ह्याचा चिकित्सक अभ्यास केला पाहिजे. दिल्लीच्या बलात्काराच्या घटनेनंतर कित्तेक अश्याच ‘आदर्श’ व्यक्तींनी आपली मते मांडली. त्यामधले काही नमुने म्हणजे की, “स्त्रीयांनी मर्यादा ओलांडू नव्हे”, “चूक त्या मुलीचीच होती, तिने त्या पुरुषांपुढे हात जोडून त्यांना ‘माझे धार्मिक भाऊ’ म्हटले असते तर असे घडले नसते”, “छोटे कपडे घातल्यामुळे असे होते” व “स्त्रियांनी घरीच बसले पाहिजे” ई. मला सांगा, जर छोटे कपडे हेच बलात्काराला कारणीभूत असले असते तर इस्लामी देशांमध्ये, जिथे स्त्रीयांना बुरख्यात राहणे हे अनिवार्य आहे, तिथे बलात्कार झालेच नसते! पण तिथे ही बलात्कार होतातच! घराच्या ‘मर्यादेत’ सुद्धा महिलांवर व मुलींवर अत्याचार व लैंगिक छळ होतातच! आणि फक्त आई-बहिणीच्या नात्यातच स्त्रीयांना ह्या छळापासून सुटकारा मिळतो असेही आपण का मानतो?
स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही व्यक्तिला परिपूर्णपणे, निडर होऊन जगण्याची, स्वतःला फुलवण्याची संधी मिळालीच पाहिजे. अब्राहम लीन्कल्ने म्हटले आहे, “Everyone has the freedom to raise their hands, as long as they don’t poke anyone else’s eye.” म्हणजेच सर्वांना स्वतःला आपल्या मनासारखं करण्याचे स्वतंत्र्य असले पाहिजे, इथपर्यंतच की ते कोणत्याही दुस-या व्यक्तीचे स्वातंत्र्यावर हावी होत नाही.
‘दामिनी’ वर घडलेल्या बलात्कारानंतर जे हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर आले, त्यांचा एकच नारा होता – “हमें चाहिये आज़ादी!” ही ‘आज़ादी’ कोण देणार? ती आपणच द्यायची असते – एकमेकांना व स्वतःलाही! प्रश्न इतकाच की आपण एक समाज म्हणून, एक देश म्हणून, एकमेकांना ही आज़ादी द्यायला ‘मुक्त’ झालो आहोत का?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s